
एस पी नाईन प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूरदि. 7 फेब्रुवारी 1986 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात 7 फेब्रुवारी रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई मा. डॉ.महेंद्र कल्याणकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते अधिकारी महासंघ कल्याण केंद्र नियोजित बांद्रा येथे आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त सात जिल्हा समन्वय समिती आणि संपूर्ण राज्यातून निवडक 26 उत्तम कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.
अधिकारी महासंघाच्या आग्रही मागणी , अभ्यासपूर्ण मांडणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अनेक प्रलंबित प्रश्न संबंधित शासनाचे सकारात्मक निर्णय होत आहेत.

यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार तथा संस्थापक ग.दी. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, कोषाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर आणि दुर्गा महिला मंचच्या अध्यक्ष सिद्धी संकपाळ आदी मान्यवर तसेच राज्यभरातील पदाधिकारी व विविध संघटना खाते प्रमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल कोल्हापूर अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग , शाखा अभियंता पुनम पाटील यांना उत्तम कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच कोल्हापूर जिल्हा आदर्श समन्वय समिती पुरस्कार घेताना साहेब वाघमोडे मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर व शिवाजी भोसले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर उपस्थित होते.
सदर वेळी डॉ. अविनाश भागवत, वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा,
सतीश बागल निवासी उपजिल्हाधिकारी, वस्तू व सेवा कर बांद्रे, मुंबईच्या उपयुक्त सुलभा भिलारे सणस, मुख्य अभियंता सा. बा. विभाग पुणे इंजि.अतुल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मुंबई सहआयुक्त सुनील चव्हाण, मंत्रालय, मुंबई अवर सचिव अशोक चेमटे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख , राज्य परिवहन महामंडळाचे संचालक (वित्त) गिरीश देशमुख, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबईचे सचिव संदीप देशमुख , अर्थ व सांख्यिकी, बांद्रा, मुंबईचे मुख्य संशोधन अधिकारी नवेदु फिरके, आयुक्त कार्यालय नागपूरचे उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, गडचिरोलीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, पशुसंवर्धन, कारंजा (लाड), वाशिम सहाय्यक आयुक्त डॉ. संदीप इंगळे , शासकीय दंत महाविद्यालय, मुंबईचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सोनाली कदम, भूमी अभिलेख, अमरावतीचे उपसंचालक डॉ. लालसिंग मिसाळ , मंत्रालयाचे अवर सचिव संतोष ममदापुरे, नागपूर जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता इंजि. योगेश्वर निंबुळकर, कक्ष अधिकारी (16 – अ ) सा. प्र. वि., मंत्रालय पल्लवी पालांडे, वैद्यकीय अधिकारी नांदेड डॉ. राजेंद्र पवार, लातूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता इंजि.बाळासाहेब शेलार, तसेच कार्यालय सचिव रजनीश कांबळे यांना पत्रकारिता पदवी संपादन केल्याबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे अमरावती, कोल्हापूर, नागपूर,नांदेड, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्हा समन्वय समितींना आदर्श जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात आले.


