
प्रथिनिधी मेघा पाटील
महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ प्रशिक्षणार्थी सत्र क्र. 66 – आय दीक्षांत संचालन परेड सोहळा नंदवाळ परेड मैदान येथे समादेशक डॉ. प्रशांत अमृतकर यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या आनंदात पार पडला.

कोल्हापूर: दि.13/03/2025 रोजी महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी नंदवाळ परेड मैदान येथे दिमाखदार संचलन केले. समादेशक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दीक्षांत संचलन समारंभात सहभागी प्रशिक्षणार्थीना सहाय्यक समादेशक / सदानंद सदांशिव यांनी शपथ दिली. तर दीक्षांत संचलन समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक/ शरद डोंगरे यांनी केले. सदर कार्यक्रमास पोलीस निरीक्षक/ अजय लिपारे, पोउपनि/संजीव गेंगजे, पोउपनि/गणेश पवार, पोउपनि/अशोक गुजर तसेच सुरक्षा परिवेक्षकीय अधिकारी श्री विश्वासराव कदम व मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणार्थी यांचे नातेवाईक उपस्थित होते.



