भारतीय सैन्य दलात सेवा बजावताना शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवानाला आले वीरमरण

0
182

प्रतिनिधी रोहित डवरी

कोल्हापूर – शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान सुनिल विठ्ठल गुजर (वव 27) हे भारतीय सैन्य दलात 2019 मध्ये भरती झाले होते. पुणे येथे बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे 110 बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंट मध्ये ते सेवा बजावत होते. मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचे वाहन 800 फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात होऊन त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सहा महिने वयाचा मुलगा व भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here