दादा दोन गाड्या जनतेच्या वतीने देतो…. परंतु आमचे प्रश्न सोडवा.….

0
63

कोल्हापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या प्रोटोकॉल नुसार वापरात येणारी सुमार दर्जाची गाडी पाहून रोखठोक स्वभावाचे दादांनी प्रशासनाला चांगलं सुनावत व पाच नवीन गाड्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याविषयी जिल्हा प्रशासनाला सुचित केले…* *स्वतःच्या व्यक्तिगत कामकाजा बरोबर सामाजिक कामाविषयी पण नेहमीच सतर्क असणाऱ्या दादांना स्वतःच्या गाडीच्या सुविधांच्याबद्दल सावधगिरी बाळगत असताना आज हीच कोल्हापूरची जनता कुठल्या त्रासात व कुठल्या प्रश्नात अडकलेली आहे याचा शोध आणि बोध घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झालेली नाही काय ?* *परवाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करून कोल्हापूरच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता देणाऱ्या या राज्य शासनाने कोल्हापूरची अनेक प्रलंबित प्रकल्पाबाबत लक्ष कधी देणार हा यक्षप्रश्न आज जनतेसमोर आहे* *तत्कालीन पालकमंत्र्यांनी घोषणा करून शंभर कोटी सह इतर रखडलेले रस्ते ..तुंबलेले गटारी ओसंडून वाहणारे नाले .. अस्वच्छ कोंढाळ्याची साचलेली ढीगसह लोकांचा श्वास गुदमरणारा झुम प्रकल्प .. राजकीय श्रेयवादात रखडलेले अनेक प्रश्न त्याचबरोबर आत्महत्या करायच्या तयारीत असलेले कंत्राटदार…* *सुधारणेच्या प्रतिक्षेत असणार शाहूजन्मस्थळ अशा अनेक प्रश्नांवर कोल्हापूर आज लढत आणी रखडत असताना आमच्या कर्तव्यदक्ष अजितदादांनी शिष्टाचाराला चांगली गाडी काय नाही याविषयी प्रशासनला झापण्याऐवजी त्यांना कोल्हापूरच्या या प्रश्नाबाबत प्रशासनाला खडसावल असत तर अत्यंत योग्य झाला असत..*. *खरंतर आज कित्येक दिवसापासून महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा हा प्रलंबित पडलेला आहे त्याला कुठलाही प्रकारच्या निधीची व्यवस्था नाही कोल्हापूरची प्रलंबित प्रश्नाबाबत अनेक प्रश्न आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी आंदोलन करून स्वतः याबाबत राज्यशासनाने कुठलीही* *हालचाल केलेली नाही.. तथापि यासंदर्भामध्ये दादा योग्य ती खबरदारी घेऊन पुढच्या मीटिंगच्या वेळेला दादांनी शिष्टाचाराच्या आलिशान वाहनाबरोबरच जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत प्रशासनाला योग्य* *त्या सूचना निर्मित कराव्यात ही आम्हाला रोखठोक भूमिकेचा दादांच्याकडून अपेक्षा आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here