पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघात कोणतीही जीवितहानी नाही

0
117

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा.

पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ गावाजवळ आज शुक्रवारी हा अपघात झाला. महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कंटेनरने पुलाचे कठडे तोडले. या अपघातामध्ये कंटनेर दोन्ही पुलाच्यामध्ये अडकून पडले.

या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती.भरधाव असणाऱ्या कंटनेर चालकाला महामार्गावरील रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर त्याचा कंटनेर पुलाचे कठडे तोडत दुसऱ्या पुलावर अडकला.

सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.सातारा शहराकडून पुणे शहराकडे कंटनेर येते होते. यावेळी कापूरहोळ गावाजवळ हा अपघात झाला. कंटनेर पुणे शहराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

अपघातानंतर या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सर्व विभागाची बैठक घेतली.

त्या बैठकीत अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, त्यावर चर्चा झाली.पुणे जिल्ह्यात अपघाताचे ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले आहे. ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत, त्या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट म्हटले जाते. पुणे जिल्ह्यात असे ६३ ठिकाणे आहेत. त्यात पुणे-नगर महामार्ग आणि पुणे बंगळुर महामार्गाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here