
एस पी नाईन प्रतिनिधी मेघा पाटील
पुणे /प्रतिनिधी : स्वाती महाळंक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच. डी. पदवी जाहीर करण्यात आली आहे.
प्रबंधाचा विषय –
“आकाशवाणी पुणे केंद्राची कार्यप्रणाली आणि मराठी साहित्य प्रसारातील योगदान”ह्या प्रबंधाबद्दल तज्ञ परीक्षकांनी व्यक्त केलेले मत असे – आकाशवाणी या विषयावर इतके इत्यंभूत संशोधन केलेला आणि तेथील कार्यक्रम, त्यातून झालेला साहित्य प्रसार आणि अनेक पिढ्यांच्या अभिरुची संपन्नतेला, परिपक्व समाज निर्मितीला हातभार लावण्यामधील आकाशवाणीचे योगदान याचा समग्र संशोधनात्मक, अभ्यासपूर्ण आढावा घेणारा हा देशातील या विषयावरील पहिला प्रबंध आहे.
स्वाती महाळंक ह्या गेले 35 वर्षे झाले माध्यम समूहात काम करत आहेत.त्यांची जिद्द ,चिकाटी,प्रामाणिकपणा व अथांग परिश्रम याच्या जोरावरच हे यश संपादन झाले आहे.यांचा सामाजिक कार्यात फार मोठा सहभाग असतो.उत्तम निवेदिका ,पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे.दिग्गज मान्यवर आणि आमदार,खासदार ,केंद्रीय मंत्री यांच्या मुलाखती घेतले आहेत.माध्यम समूहामध्ये त्यांचे खूप चांगले योगदान आहे.या पुण्यामध्ये स्थायिक आहेत.