
एस पी नाईन कागल उपसंपादक स्वप्निल गोरंबेकर
कागल तालुक्यातील यमगे गावांमधील सुपुत्र बिरदेव डोणे यांची आयपीएस अधिकारी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार लोककल्याण समता प्रतिष्ठान कागल यांच्या वतीने भारतीय संविधान प्रत व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे यांनी सत्कार च्या वेळी बोलताना बहुजन समाजातील मुलांनी अभ्यास करून विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करुन यश संपादित केले पाहिजे. मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करताना काही अडचण असल्यास आपण मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
यावेळी लोक कल्याण समता प्रतिष्ठान उपाध्यक्ष दिलीप कांबळे सर मा.नगरसेवक मुरगुड, मा. मुख्याध्यापक श्यामप्रसाद कांबळे सर खिंडी व्हरवडे , सामाजिक कार्यकर्ते महेश धम्मरक्षित सर यमगरणी , संदीप कांबळे सर धामणे, आर. आर. प्रधान पंडेवाडी ,तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी सरपंच अनिल कांबळे सुरुपली ,डी. एम. वनिक सर आश्रम शाळा चिमगाव , प्रा. अशोक कांबळे सर मळगेकर,दत्ता कांबळे कुरुकुली, नागेश कांबळे व्हनाळीकर,कवी कृष्णात कांबळे भडगाव , प्रणव वनिक मुरगुड, व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे बस्तवडेकर यावेळी उपस्थित होते