
प्रतिनिधी मेघा पाटील
गेल्या काही दिवसांपासून सूर्यावर सतत होणारे स्फोट आणि वादळं यामुळे अवकाश हवामान तज्ज्ञांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नासाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सूर्यावरून उत्सर्जित होणाऱ्या शक्तीशाली सौर किरणांचा परिणाम थेट पृथ्वीवर होण्याची शक्यता आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, हे सौर वादळ मोबाइल नेटवर्क, सॅटेलाइट सेवा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि वीज व्यवस्थेवर मोठा परिणाम करू शकते. यामुळे मोबाइल सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अशा प्रकारच्या सौर वादळांचा प्रभाव पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर होत असल्याने, तंत्रज्ञानावर अवलंबून असलेली यंत्रणा काही काळासाठी बाधित होऊ शकते. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि आवश्यक त्या सेवांबाबत पर्यायी उपाय ठेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.