
प्रतिनिधी अमर पाटील शाहूवाडी
..कोडोली (ता. पन्हाळा) – येथील कै. मा. श्री. प्रकाश शंकरराव पाटील (नाना) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आलेल्या स्मृती भवन तथा हनुमान हॉलसाठी शासनामार्फत ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या हॉलचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या हॉलसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल **श्री. सुभाष शंकरराव पाटील (कर्नल), दिकपालसिंह बाळासाहेब पाटील (बाबा), व राहुल प्रकाश पाटील** यांचा आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी खासदार **निवेदिता माने (वहिनी)**, गोकुळ दूध संघाचे संचालक **अमरसिंह पाटील (भाऊ)**, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक **डॉ. जयंत प्रदीप पाटील**, **नंदन अमरसिंह पाटील**, पन्हाळा गटविकास अधिकारी **सोनाली माडकर**, कोडोली सरपंच **सुनिता बाजीराव केकरे**, उपसरपंच **प्रशांत जमने**, ग्रामसेवक **जयवंत चव्हाण-पाटील**, कंत्राटदार **आदित्य माणिक मोरे** यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे कोडोली गावात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक महत्त्वाचे स्थळ निर्माण झाले असून, गावच्या विकासात आणखी एक मोलाची भर पडली आहे.—


