
Sp-9 प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर दिनांक 29-शिवाजी विद्यापीठाच्या सेवानिवृत्त माजी सैनिकांनी सोमवार दिनांक 21 जुलैपासून विविध मागण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज नववा दिवस व नागपंचमी चा दिवस असल्यामुळे माजी सैनिकांनी विद्यापीठाच्या दारातच आंदोलन स्थळी नागाची पूजा करून झोपलेल्या विद्यापीठ प्रशासनाला उपहासात्मक नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या नागाच्या प्रत्येक फनीवर माजी सैनिकांच्या मागण्याही लिहिलेल्या होत्या 26 तारखेचा कारगिल दिन ही माजी सैनिकांनी कारगिल मधील हुतात्म्यांच्या फोटोला हार घालून जिलेबी वाटून विद्यापीठाच्या दारातच आंदोलन स्थळी कारगिल दिन साजरा केला होता यावेळी साती शिवाजीराव परळीकर यांनी महात्मा गांधींच्या शांतता माय मार्गाने चाललेले आंदोलन विद्यापीठ प्रशासनाने सर्व मार्ग वापरून दडपण्याचा प्रयत्न केला तरीही मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही उलट अधिक तीव्र होईल . उभ्या पावसात आंदोलन केल्याने आंदोलन माजी सैनिक दत्तात्रय मोहिते हे तापाने आजारी पडल्याने आंदोलन सैनिकात तीव्र संताप दिसून येत पण तरीही आंदोलन थांबणार नाही असा निर्धार करूनत्याचा पुढचा टप्पा म्हणून प्रत्येक दिवशी दोन माजी सैनिक चक्री उपोषण करतील व आंदोलनाची तीव्रता वाढवू असा , इशारा विद्यापीठ प्रशासनाला देऊन, प्रसंगी उच्च शिक्षण संचालक व उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील व पालकमंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांची भेट घेऊन शिवाजी विद्यापीठातील गैर कारभार करणाऱ्या व दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे परुळेकर यांनी सांगितले . आंदोलन स्थळ हायवेवर असल्यामुळे व विद्यापीठाच्या दारात मंडप घालण्यास विद्यापीठ प्रशासनाने विरोध केल्याने, उभ्या पावसात भिजून माजी सैनिक करत असलेल्या रास्त मागण्यांच्याआंदोलनाला बऱ्याच लोकांनी येऊन पाठिंबा दिला व विद्यापीठ प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.यावेळी सर्व माजी सैनिक, साथी मधुकर पाटील ,साथी रवी जाधव ,अरुण पवार हे हजर होते. मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक व शशिकांत रथपवार व महिला आघाडीचे अध्यक्ष यांनीही आंदोलनाला येऊन पाठिंबा दिला.