
एसपी नाईन प्रतिनिधी रोहित डवरी
कोल्हापूर : जिनगौडा नेमगौडा पाटील (वय ७८) हे शुक्रवार, दि. २५ जुलै २०२५ रोजी पहाटे ४ वाजता डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर येथून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या उजव्या हाताला प्लास्टर असून डाव्या हाताला सलाईन लावलेली होती. अशा गंभीर अवस्थेत त्यांचा रुग्णालयातून अचानक गायब होणे ही अतिशय चिंतेची बाब आहे.त्यांच्या परिवारातील मी, उषा पाटील, रा. कदमवाडी, कोल्हापूर (मोबाईल : ९४२३२६५४८५) – यांनी ही माहिती दिली आहे. सदर व्यक्तींचा शोध सुरू असून अद्याप कुठल्याही ठिकाणी त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.जिनगौडा पाटील यांना कोठेही पाहिले असल्यास किंवा त्यांच्या संदर्भात काहीही माहिती असल्यास कृपया श्री. बाहुबली नेमगोडा पाटील (मोबाईल : ९४२३२८७०११) यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.कृपया ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, ही विनंती.