
प्रतिनिधी मेघा पाटील
पुणे | ३१ जुलै २०२५**सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. शांताराम बळवंत मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुण्यातील सिंबायोसिस विश्वभवन येथे झालेल्या या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने केले होते.या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती, डॉ. संजीवनी मुजुमदार, सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉ. मुजुमदार कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या निमित्ताने *सकाळ* तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘**ज्ञानपर्व**’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुरवणीत डॉ. मुजुमदार यांच्या शैक्षणिक योगदानावर आणि त्यांच्या दूरदृष्टीचा आढावा घेण्यात आला आहे.डॉ. मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली सिम्बायोसिस संस्थेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून त्यांचे योगदान आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार यावेळी राज्यपालांनी काढले.
