प्रतिनिधी जानवी घोगळे
पन्हाळा : आगामी गणेशोत्सव 2025 शांततेत, नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. संजय बोंबले साहेब यांच्या आदेशानुसार विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक बुधवार, दिनांक 30 जुलै 2025 रोजी, सायंकाळी 5 वाजता तेजस्विनी हॉल, कोतोली येथे होणार आहे. यामध्ये पन्हाळा पोलीस ठाणे हद्दीतील कोतोली, आळवे, कोलोली, वाघवे, पिंपळे, गोलिवडे, उत्रे, कणेरी आदी गावांतील पुढील मान्यवरांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे:
🔹 ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य
🔹 महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष
🔹 पोलीस पाटील
🔹 सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते
🔹 साउंड सिस्टीम, डेकोरेटर्स, डिजिटल प्रिंटिंग प्रेस चालक व मालक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व समन्वय राखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, सर्व संबंधित मान्यवरांनी वेळेत उपस्थित राहून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.
📝 कळावे
— पन्हाळा सहाय्यक पोलीस निरीक्षकसो, पन्हाळा पोलीस ठाणे यांच्या आदेशाने