
मेघा पाटील प्रतिनिधी
मुंबई | ३० जुलै २०२५**जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त राज्य महिला आयोगाच्यावतीने ‘**संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा**’ या विषयावर एक विशेष कृतिशाळा (वर्कशॉप) आयोजित करण्यात आली. ही कृतिशाळा मुंबईतील **सह्याद्री राज्य अतिथीगृह** येथे पार पडली.या कार्यक्रमात विधानपरिषद उपसभापती **डॉ. नीलम गोऱ्हे**, पशुसंवर्धन व पर्यावरण बदल मंत्री **पंकजा मुंडे**, महिला व बालविकास मंत्री **आदिती तटकरे**, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री **पंकज भोयर**, महिला व बालविकास राज्यमंत्री **मेघना बोर्डीकर**, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा **रुपाली चाकणकर** प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमामध्ये बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, “मानवी तस्करीसारख्या अमानवी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासन आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन कटिबद्ध असून जनजागृतीसह ठोस कृती आवश्यक आहे. मानवी तस्करीविरोधात केवळ कायदेच नव्हे, तर संवेदनशीलतेची गरजही आहे.”यावेळी **मानवी तस्करीविरोधी कायदे, मदतीचे पर्याय, उपलब्ध संसाधने** याबाबत माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. **विदर्भातील व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या अन्वेषण अहवालाचे** देखील प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमात अनेक मान्यवर आमदारही सहभागी झाले होते. यामध्ये **आमदार प्रज्ञा सातव**, **आमदार श्रीजया चव्हाण**, **आमदार मनिषा कायंदे**, **आमदार हारून खान**, **आमदार सना मलिक** यांचा समावेश होता. याशिवाय राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव **नंदीनी आवाडे**, **सामाजिक संस्था प्रतिनिधी**, **ॲन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे पोलीस अधिकारी**, **विधी सेवा प्राधिकरण**, तसेच **मानवी तस्करीविरोधात कार्यरत अनेक अधिकारी व कर्मचारी** या कृतिशाळेस उपस्थित होते.देशभरातून या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आणि वक्ते उपस्थित राहून परिसंवादात आपले विचार मांडले. मानवी तस्करीविरोधातील कार्यात सर्व संबंधित विभागांनी एकसंघ आणि प्रभावी कृतीसाठी सज्ज राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
