“ULTIMATE KISHORE” कार्यक्रमाद्वारे किशोर कुमार यांना अनोखी श्रद्धांजली – दशकपूर्तीचा सोहळा रंगणार 3 ऑगस्ट रोजी..

0
17

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर | 3 ऑगस्ट 2025, रविवार – दुपारी 4:00 वाजता**मैत्री दिवस आणि किशोर कुमार यांच्या 96व्या जयंतीचे औचित्य साधत, **दिनेश माळी फाऊंडेशन**, **स्वर आभास, कोल्हापूर** व **झंकार बिट्स** यांच्या संयुक्त विद्यमाने “ULTIMATE KISHORE” हा अनोखा संगीतसोहळा सादर केला जाणार आहे.या कार्यक्रमाची यावर्षी **दशकपूर्ती** होत असून, गेल्या दहा वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे हा कार्यक्रम दरवर्षी नित्यनेमाने साजरा केला जात आहे. या उपक्रमामागे केवळ संगीतप्रेमच नव्हे, तर समाजप्रती असलेली बांधिलकीही आहे. कोणताही गाजावाजा न करता समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे कामही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे.या संगीतयात्रेची परंपरा अशीच अखंडित सुरू राहावी आणि पुढील वर्षी किशोरदांचा 97वा वाढदिवस **संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह** येथे दिमाखात साजरा करावा, ही आयोजकांची विनम्र इच्छा आहे.तर न चुकवता भेटूया **3 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता** या अविस्मरणीय कार्यक्रमाला!🎫 **तिकीट विक्री ठिकाण:** देवल क्लब📞 **संपर्क:*** संजय लोंढे – 9890980321* टेलीफोन बुकिंगसाठी: दिनेश माळी – 9850587662* समीर मोहिते – 8975620929

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here