5 वी, 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज करण्यास मुदतवाढ

0
14

प्रतिनिधी जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्र. सचिव प्रमोद गोफणे यांनी दिली आहे.
दिनांक 1 ते 14 ऑगस्ट 2025 रोजी (रात्री 11.59 वाजेपर्यंत) या कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज भरावयाचे आहेत. दिनांक 19 ते 29 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावयाचे आहेत. दिनांक 4सप्टेंबर 2025 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी.
नमूद कालावधीत मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करवा. अर्ज भरण्याबाबतच्या आवश्यक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव बसवेश्वर किल्लेदार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here