
प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागांतंर्गत केंद्र शासनाच्या वतीने डीएनटी विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग SEED योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ डीएनटी, एनटी व एसएनटी घेण्यासाठी लाभार्थ्यांनी 3 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज घेण्यासाठी महाविद्यालयांना विभागातील व जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मोहीम स्वरुपात प्रसार करुन लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्रता- डीएनडी, एनटी व एसएनटी विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थी राज्य व केंद्र सरकारच्या कोणत्याही कोचिंग योजनेचा लाभ घेत नसावा. या योजनेमध्ये विद्यार्थ्याला 1 लाख 20 हजार रुपये शिकवणी शुल्क दिले जाईल.
https://www.buddy4study.com/application/FCDNT2/instruction या लिंकवर संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी mosje@buddy4study.com या मेल आयडी वर किंवा 080-474-95118 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी वरील लिंकवर संपुर्ण माहिती दिनांक 3 ऑगस्ट 2025 पर्यंत भरणे आवश्यक आहे, असे आवाहन श्रीमती नेर्लीकर यांनी केले आहे.