प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर, दि.4 (जिमाका): जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, वादन इ. क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 10 वीमध्ये 90 टक्के तसेच 12 वीमध्ये 85 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण माजी सैनिक, विधवांचे पाल्य, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
प्राप्त प्रकरणामधुन प्रत्येक शैक्षणिक बोर्डातील गुणानुक्रमे दहा प्रकरणे शिफारस करुन सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहेत. माजी सैनिकांनी संबंधित कार्याबद्दलची प्रमाणपत्रे, गुणपत्रे, सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्र या कागदपत्रासह दिनांक 15 सप्टेंबर 2025 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापुर येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल भिमसेन चवदार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.