
प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
भुदरगड : भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील पुष्पनगरातील सराफी दुकान व घरफोडी करून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा भुदरगड पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत तपास करत दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.सदर दरोडेखोर हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बारा दरोडेखोरांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून एक लाख रूपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप चारचाकी वाहन जप्त केले आहे. गारगोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे व पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या पोलीस पथकाची दमदार कामगिरी केली आहे.