आयपीएस अधिकारी बिरदेव सिद्धाप्पा ढोणे यांचा एस. पी. नाईन मराठी माध्यम समूहाकडून सत्कार

0
228

प्रतिनिधी जानवी घोगळे

युपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये रँक 551 मिळवत आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करणारे बिरदेव सिद्धाप्पा ढोणे यांचा आज एस. पी. नाईन मराठी माध्यम समूहाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

या सत्कार कार्यक्रमात माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी ढोणे यांनी आपला संघर्षमय प्रवास थोडक्यात मांडला आणि विद्यार्थ्यांना ध्येय ठेऊन सातत्याने मेहनत करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान ढोणे आणि सागर पाटील यांच्यात मनमुराद गप्पा रंगल्या. लवकरच त्यांची प्रेरणादायी मुलाखत व सदिच्छा भेट माध्यम समूहामार्फत घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

या सोहळ्याला सागर पाटील (मॅनेजिंग डायरेक्टर), रोहित डवरी, श्रीकांत शिंगे, बाहुबली भोसे, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

➡️ एस. पी. नाईन मराठी माध्यम समूहाने ढोणे यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here