
प्रतिनिधी अभिनंदन पुरीबुवा कागल :
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. नुकतंच शासनाने घेतलेल्या “शेतरस्त्यांचे सीमांकन करून त्यांना सांकेतिक क्रमांक देण्याच्या” निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराजस्व अभियान – सेवा पंधरवडा अंतर्गत १७संप्टेबर ते २२ सप्टेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत गावनिहाय शेत/पाणंद/शिव रस्त्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करून त्यांना सांकेतिक क्रमांक ऑलॉट करणे व शेतरस्ते अदालतींचे आयोजन करून शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे इत्यादी. कामे केली जाणार आहेत.तरी चिमगांव ता कागल मधील सर्व नागरीकांना कळविणेत येते की शासनाच्या सेवापंधरावढा कार्यक्रमा आंतर्गत ग्रामीण शेत रस्ते व पाणंद रस्ते बाबत व इतर शासकीय योजनेबाबत सेवा रस्ता अदालतीचे आयोजन शुक्रवार दि १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता चिमगांव ग्राम पंचायत हॉल येथे केले असून चिमगांव मधील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन चिमगांवचे लोकनियुक्त सरपंच दिपक आंगज यांनी केले.