
प्रतिनिधी जानवी घोगळे
कळंबा ते फुलेवाडी या रिंग रोडवर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि वाढती वस्ती यामुळे गुन्हेगारी प्रकारात वाढ होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकत्याच या परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर फुलेवाडी रिंग रोडवर सत्वर पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी शिवसेना उबाटा गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिष्टमंडळामध्ये जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, अवधूत साळुंखे, माने स्मिता मांढरे, अमोल साळुंखे, रूपाली घोरपडे, अभिजीत पाटील, अनिता ठोंबरे, सुनीता मुळीक, शंकर खोत यांचा समावेश होता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही मागणी तातडीने मान्य व्हावी, यासाठी शिष्टमंडळाने आग्रही भूमिका घेतली.
या मागणीचा सकारात्मक विचार करून प्रशासकीय पातळीवर त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शिष्टमंडळास दिले.