
कोल्हापूर : प्रतिनिधी रोहित डवरी :
नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी येथील श्री शिवशक्ती तरुण मंडळ व श्री स्वामी रणरागिनी महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्ष्मी कुंकू मार्चन व होम मिनिस्टर सोहळा मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने पार पडला. या कार्यक्रमाला कोल्हापूर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सोहळ्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष आदर्श समाजसेविका व उद्योजिका सौ. पूनम मोरे यांनी केले होते. तर *सपोर्ट पार्टनर सौ. स्नेहा सुमित पोवार * यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक गिफ्ट देऊन शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, सुवासिनींसाठी कुंकू मार्चनसोबतच मोठ्या संख्येने साड्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी सामाजिक व उपयुक्त असे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर सुरक्षितपणे कसा वापरावा याबाबत मार्गदर्शन व थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. गॅस गळतीमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी हे मार्गदर्शन उपयुक्त ठरले.

या वेळी एसपी नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सागर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका पूनम मोरे यांच्या हस्ते लकी ड्रॉचे बक्षिसे तसेच साड्या महिलांना देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे आयोजन सौ. रेणुका जाधव, सौ. मनीषा शेटे, सौ. सीमा पुरेकर यांनी केले. तर कुंकू मार्चनचे साहित्य श्री शिवशक्ती तरुण मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आले होते.
सोहळ्यातील खास आकर्षण ठरला *होम मिनिस्टर कार्यक्रम, जो सुप्रसिद्ध गायक आणि सर्वांचे लाडके *भाऊजी पी. कुमार यांच्या खुमासदार निवेदनात पार पडला. महिलांनी खेळ-गमती, प्रश्नोत्तरं आणि विविध स्पर्धांत उत्साहाने सहभाग घेत भरपूर बक्षिसं जिंकली.

या कार्यक्रमातून समाजातील महिलांना प्रोत्साहन, आनंद आणि स्नेहबंध यांचा सुंदर संगम घडला. महिलावर्गाने आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानत हा सोहळा आनंदात व उत्साहात संपन्न झाला.
👉 आयोजकांचे व पूनम मोरे यांचे कौतुक सर्वत्र होत असून, महिला सबलीकरणासाठी त्यांचे योगदान विशेष मानले जात आहे.
