प्रा. अरुणा महाळंक यांचे निधन –

0
35

पुणे ता. 27 : पुण्यातील ज्येष्ठ भाषा संशोधक आणि लेखिका अरुणा महाळंक ( वय 77 ) यांचे काल , ता. 26 रोजी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. केंद्र सरकारच्या मैसूर इथल्या भारतीय भाषा संस्थान मध्ये त्यांनी दीर्घकाळ भाषाशास्त्राच्या तज्ञ म्हणून काम केले होते. पुण्यातील टिळक शिक्षण महाविद्यालय, राजगड ज्ञानपीठ, भोर अभिनव शिक्षण महाविद्यालय, आंबेगाव येथेही त्यांनी शिक्षणशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम केले. कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तक मंडळाच्याही त्या सदस्य होत्या. हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली असून त्याच्या अनेक आवृत्ती निघाल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील महिलांसाठी कागदी, कापडी, मेणाची फुले, पेंटिंगचे विविध प्रकार, कला कौशल्याच्या वस्तू त्याचप्रमाणे महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने घरच्या घरी बेदाणे, टूटीफ्रूटी तयार करणे, ड्रायक्लीनिंग इत्यादींचे नि:शुल्क वर्ग त्यांनी अनेक वर्षे चालविले. ज्येष्ठ पत्रकार आणि आकाशवाणीच्या ज्येष्ठ वृत्त निवेदक डॉ. स्वाती महाळंक आणि ज्येष्ठ आयुर्वेदतज्ञ डॉ. अभिजीत महाळंक यांच्या त्या मातोश्री होत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here