कै. श्री शरद गायकवाड तात्या स्मृतीस चषक २०२५ – क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न!– आळवे स्पोर्ट्स आळवे यांच्या वतीने शानदार आयोजन…

0
242

प्रतिनिधी प्रा. मेघा सागर पाटील

(ता. पन्हाळा) :कैलासवासी श्री शरद गायकवाड तात्या यांच्या स्मरणार्थ *आळवे स्पोर्ट्स, आळवे* यांच्या वतीने आयोजित “**कै. श्री शरद गायकवाड तात्या स्मृतीस चषक २०२५**” ही भव्य क्रिकेट स्पर्धा नेहरू हायस्कूल क्रीडांगण, कोतोली येथे अत्यंत उत्साहात पार पडली.राजकारणासह खेळातही रस असलेल्या आणि क्रिकेटप्रेमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कै. श्री शरद गायकवाड यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विविध नामांकित संघांनी सहभाग नोंदवून सामने अधिक रंगतदार बनवले. 🏆 *बक्षिसे व पारितोषिक वितरण*या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.

प्रथम क्रमांक : ₹21,000 व चषक कै. श्री शरद गायकवाड यांच्या स्मरणार्थ शुभम शरद गायकवाड यांच्याकडून देण्यात आले.द्वितीय क्रमांक: ₹11,000 व चषक कै. सौ. मालूबाई कृष्णात पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजी कृष्णात पाटील यांच्याकडून प्रदान.तृतीय क्रमांक : ₹7,000 व चषक श्री शिवाजी हिंदुराव बंगे चतुर्थ क्रमांक: ₹5,000 व चषक श्री अजित बंगे यांच्याकडून प्रदान.

🏅 वैयक्तिक पारितोषिके फायनल मॅन ऑफ द मॅच (स्मार्ट वॉच)विनायक जाधव (उचगाव)बेस्ट बॅट्समन (Shoes)प्रशांत गुमाने (उचगाव)बेस्ट बॉलर (Shoes)करण चव्हाण (रुकडी)मॅन ऑफ द सिरीज (32” LED TV) झेलसिंग पाटील (पडळ) 🏏 विजयी संघ🥇प्रथम क्रमांक: मनेरमळा स्पोर्ट्स, उचगाव 🥈द्वितीय क्रमांक:आळवे स्पोर्ट्स, आळवे 🥉तृतीय क्रमांक, उंड्री स्पोर्ट्स, रुकडी🎖️चतुर्थ क्रमांक: K K स्पोर्ट्स, पडळया स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले.चषक देणगीदार – जीवन शिंदे (दख्खन पन्हाळा), भरत मोरे (माजी सरपंच देवठाणे), संभाजी नावे (सांगरूळ), सागर वर्पे, सचिन पाटील (क्रिकेट बॉल देणगी).

विशेष सहकार्य:शिवाजी गायकवाड (माजी सरपंच आळवे), अनिश पाटील, अमित पाटील (माजी सरपंच ठाणे), मंडलिक गायकवाड (डेप्युटी सरपंच आळवे), अंकुश पाटील, सरदार कुंभार, धर्मराज खामकर (माजी डेप्युटी सरपंच), शुभम नामदेव चौगुले, रणजीत आनंदराव चौगुले, एस.डी. पाटील (कोतोली), विश्वनाथ पवार (माजी सरपंच केरली), संतोष चिकाने आणि अमृत कलेक्शन यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले.या स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन शुभम शरद गायकवाड, अक्षय लाड, दिग्विजय खामकर, वैभव पाटील यांनी अत्यंत उत्तमरीत्या पार पाडले.—या स्पर्धेच्या माध्यमातून कै. श्री शरद गायकवाड तात्या* यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा आदर्श पुन्हा एकदा सर्वांच्या मनात उजळला. खेळभावना, एकता आणि मैत्रीचा सुंदर संगम या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here