
प्रतिनिधी : रोहित डवरी
शिरोळ तालुका म्हणजे पर्यटन विकासाला चालना देणारा एक सर्वांगीण तालुका जसे की खिद्रापूर कोपेश्वर मंदिर, नृसिंहवाडी,सेनापती संताजी घोरपडे घाट परंतु तालुक्यातील स्थानिक रस्ते बघितले तर एकदा भेट दिलेल्या व्यक्तीला पुन्हा तालुक्यात परत न येण्याची इच्छा झाली तर यात वावग अस काहीच नाही. आणि याला कारणीभूत आहेत ते तालुक्यातील रस्ते.
सध्या टाकळी ते दानवाड हा प्रमुख मार्ग इतकी वर्षे झाले इतक्या भयानक अवस्थेत आहेच शिवाय रस्त्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष प्रखर्षणे जाणवत आहे.

आज छत्रपती ग्रुपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष श्री.रोहित भाऊ मलमे यांच्या नेतृत्वात अभियंता सा.बा.विभाग जयसिंगपूर श्री.सूर्यवंशी साहेब यांना तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करून काम सुरू करण्या बाबत चे निवेदन देण्यात आले. यामध्ये येत्या 8 दिवसात तत्काळ कामास सुरुवात करण्याचे आश्वासन अभियंता यांनी दिले.तसे न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री रोहित भाऊ मलमे यांनी दिला.
यावेळी छत्रपती ग्रुप जयसिंगपूर शहर प्रमुख श्री.विनायक पाटील,सागर पवार,कृष्णा होगले,दीपक नंदिवले,अमर चौगुले,ऋषी कुरणे यांच्यासह छत्रपती ग्रुप चे पदाधिकारी बांधव उपस्थित होते.



