कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
बॉलिवूडचा सिनेमा मदर इंडियाला साजेल अशी स्टोरी त्रिपुरामध्ये समोर आली आहे. एका आईनेच मुलाविरोधात साक्ष देत त्याला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल असे न्यायालयात ठणकावून सांगितले आहे.
न्यायालयाने तिच्या साक्षीवरून तिच्या मुलाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
एका महिलेवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणावरील सुनावणी त्रिपुराच्या सिपाहीजाला जिल्हा न्यायालयात सुरु होती. माझा मुलगा असला तरी मी खऱ्याची साथ देणार आहे. माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्राने महिलेचा खून केला आहे, असे तीने न्यायालयात सांगितले आहे.
बिशाल नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी सुमन दास या ५५ वर्षीय विधवा महिलेची हत्या करण्यात आली होती. तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांना होता. कृष्णा दास आणि चंदन दास यांनी तिचा खून केला होता.
एप्रिल २०२० मध्ये ही घटना घडली होती. पोलिसांनुसार या दोघांनी तिच्या घरी तिच्यावर बलात्कार केला होता, यानंतर तिचा गळा दाबून खून केला होता.
महिलेच शव पडक्या विहिरीत फेकले होते. महिलेच्या सुनेच्या तक्रारीवरून तिचा शोध घेतला गेला, तेव्हा तिचा मृतदेह सात-आठ दिवसांनी सडलेल्या अवस्थेत सापडला होता.
आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली, परंतू बलात्काराच्या आरोपातून त्यांना मुक्त करण्य़ात आले. महिलेचे शरीर सडलेल्या अवस्थेत असल्याने बलात्कार झाला हे तपासणे शक्य नव्हते.