बिबट्याच्या बछड्यांचे आईशी घडले पुनर्मिलन, जखिणवाडीतील घटना

0
82

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

कऱ्हाड : तालुक्यातील जखिणवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची वनविभागाने सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्या बछड्यांचे त्यांच्या आईशी पुनर्मिलन घडवून आणण्यातही वनविभागाला यश आले आहे.

रविवारी मध्यरात्री मादी बिबट्या तिच्या दोन्ही बछड्यांना घेऊन शिवारात निघून गेली.

जखिणवाडी येथील एका विहिरीत शनिवारी सकाळी बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. वन विभागाने दिवसभर अथक प्रयत्न करून दोन्ही बछड्यांना पिंजऱ्यात सुखरूप जेरबंद केले.

त्यानंतर त्या बछड्यांना परिसरातच एका झाडाखाली ठेवण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव वन विभागाने त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅपही लावला होता.

तसेच मादी बिबट्या त्याठिकाणी येऊन त्या बछड्यांना सोबत घेऊन जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. अखेर रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास संबंधित बछड्यांचे त्यांच्या आईशी पुनर्मिलन घडवून आणण्यात वन विभागाला यश आले.

मध्यरात्री त्याठिकाणी आलेल्या मादी बिबट्याने दोन्ही बछड्यांना आपल्यासोबत घेतले.

त्यानंतर संबंधित मादी बछड्यांना घेऊन तेथून शिवारात पसार झाली. वनविभागाच्या प्रयत्नामुळे हे पुनर्मिलन घडून आले. वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये हा प्रसंग कैद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here