कोल्हापूर ताराबाई पार्क येथे बिबट्या जेरबंद

0
261

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापुरातील हॉटेल वूडलँडमध्ये बिबट्या घुसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका बंगल्यातून उडी मारत बिबट्याने थेट हॉटेलच्या गार्डनमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी काम करणाऱ्या माळीवर त्याने हल्ला करून त्याला किरकोळ जखमी केले. यानंतर बिबट्याने हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असलेल्या निखील कांबळे या युवकावरही हल्ला केला, ज्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. हॉटेलमधून पुढे उडी घेत बिबट्याने बीएसएनएल कार्यालयात प्रवेश केला, आणि तेथून महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसला आहे.

बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला, ज्यात ते जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभाग, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच नागरिकांना त्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here