
- प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर
विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांचा सेवागौरव सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न.
कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरिंगे
शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक व प्राचार्य म्हणून 39 वर्षे सेवा बजावणारे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड, कडेपूर, सातारा, तासगाव, इचलकरंजी आणि विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे आपल्या उत्तम प्रशासनाच्या जोरावर आणि दूरदृष्टीतून येथील महाविद्यालयांचा विकास केला. माणसांना जपणारे आणि घडविणारे व्यक्तिमत्व म्हणून प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांना ओळखले जाते. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सहनशिलता, विनम्रता, उत्तम नेतृत्व गुण, हाडाचे शिक्षक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, प्राचार्य, उत्तम प्रशासक, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची जाण, कौटुंबिक सुखदु:खात आधार देणारे आधारवड, शिस्तप्रिय, महत्वाकांक्षी असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. वास्तुपुरुष म्हणून त्यांना वरदान लाभले आहे. महाविद्यालयांच्या भौतिक उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. विवेकानंद कॉलेजला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य
अभयकुमार साळुंखे यांचा खंबीर पाठिंबा होता त्यामुळेच शिक्षणक्षेत्रात मुक्तपणे यशस्वी वाटचाल करु शकलो. माझ्या या प्रवासात शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे. संस्थेने ज्या ज्या ठिकाणी मला सेवेची संधी दिली त्या शाखांचा परिपूर्ण अभ्यास करुन तेथील शैक्षणिक व भौतिक सुविधांचा विकास केला. जरी मी दुस-या संस्थेत जात असलो तरी या संस्थेशी जोडलेली माझी नाळ तशीच राहील, असे भावनिक उद्गार काढले.
याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर जिल्हयाचे विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, प्राचार्य डॉ.सतिश घाटगे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.हितेंद्र साळुंखे , एस.जी.एम. कॉलेज, कराडचे प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रा.जे.के.पाटील, डॉ.एकनाथ आळवेकर, डॉ. संजय लठ्ठे, डॉ.डी.आर.तुपे, प्रा.एम.आर.नवले, डॉ वर्षा शिंदे यांनी मनोगते मांडली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एस.पी.थोरात यांनी केले तर आभार प्रा.सौ. शिल्पा भोसले यांनी मानले. सुत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा. अविनाश गायकवाड यांनी केले. यावेळी प्रा.एच.पी.पाटील, मस्के, बी.एम.पाटील, प्राचार्य डॉ. शंकर खाडे, डॉ डी ए देसाई, प्रा. विलास पाटील, प्रा. किरण पाटील, प्रा. एम एम कांबळे, प्रा डॉ पी एस कांबळे, स्टाफ सेक्रेटरी डॉ.कविता तिवडे व डॉ.राजश्री पाटील याचबरोबरच संस्थेचे आजीव सेवक, विविध महाविद्यालयातील प्राचार्य, डॉ. आर. आर. कुंभार यांचे कुटुंबीय, रजिस्ट्रार श्री एस के धनवडे, विवेकानंद कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.

