
कोल्हापूर हॅलो प्रभात : शिवाजी विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या इंटर झोनल टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरने चमकदार खेळ करत के.आय.टी. कॉलेजवर ५-३ असा विजय मिळवून विजेतेपद पटकाविले.ही स्पर्धा शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे पार पडली. सातारा, सांगली व कोल्हापूर विभागातील १२० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते झाले.या स्पर्धेतून गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले व सहकाऱ्यांचे योगदान लाभले.

