
प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर प्रतिनिधी: शिवाजी विद्यापीठ झोनल पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरने उत्कृष्ट खेळ करून तृतीय क्रमांक पटकाविला. या यशामुळे महाविद्यालयाचा संघ कर्मवीर हिरे कॉलेज, गारगोटी येथे होणाऱ्या इंटरझोनल स्पर्धेसाठी निवडला गेला.
या यशासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे व सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, डॉ. विकास जाधव व प्रा. संतोष कुंडले यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने उल्लेखनीय कामगिरी केली.

