
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वर्धापन दिन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय श्रीपतराव चौगुले (दादा) यांचा १४ वा स्मृतिदिन श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला.दादांच्या प्रतिमेचे पूजन ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. बी. एन. रावण, सहसमन्वयक डॉ. एस. एस. कुरलीकर, ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार, लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संपदा पिसे, डी. एड. कॉलेजचे प्राचार्य गजानन शिंदे, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तेजस्विनी पाटील, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका ऊर्मिला चौगुले व सेमी इंग्लिश विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश भोसले प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाला ज्ञानगंगा संकुलातील सर्व शिक्षकवृंद, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादांना विनम्र अभिवादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. पी. डी. माने यांनी केले. तर आभार प्रा. ए. आर. महाजन यांनी मानले.

