
पाचगाव : प्रतिनिधी पांडुरंग
फिरींगे करवीर तालुक्यातील पाचगाव येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये जलजीवन मिशनअंतर्गत ओम पार्क परिसरातील नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम तसेच वटवृक्ष कॉलनी ते महालक्ष्मी पार्क या मार्गावरील ओम पार्क कॉर्नर येथील नाल्यावर साकव बांधकाम या दोन महत्त्वपूर्ण विकासकामांच्या भव्य शुभारंभ सोहळ्याने आज पाचगावमध्ये विकासाची नवी पहाट उजाडली.या शुभारंभासाठी पाचगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. प्रियंका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला. सोबतच मा. पंचायत समिती सदस्य दिलीप जाधव साहेब, माजी सरपंच संग्राम पाटील, कोअर कमिटी अध्यक्ष नारायण गाडगीळ, सन्माननीय ग्रा.पं. सदस्य व माजी उपसरपंच श्री. शांताराम पाटील, सचिन पाटील, संजय शिंदे, संग्राम पोवाळकर, रोमाताई नलवडे, प्रकाश गाडगीळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उठाव मिळाला.भागातील जेष्ठ नागरिकांमध्ये गुंजाटे साहेब, उंडाळे काका, ढोनगे साहेब, रजतभाई शर्मा, चव्हाण काका, बाळासो पाटील यांच्यासह अनेक महिला व युवा कार्यकर्ते, तसेच सर्व आजी–माजी पदाधिकारी यांनी उत्साहात सहभाग नोंदवला.दोन्ही कामांचा शुभारंभ होताच नागरिकांनी समाधान व्यक्त करत विकासकामांना गती मिळाल्याने पाचगावचा चेहरा बदलणार असल्याची भावना व्यक्त केली.

