मनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजचा दणदणीत विजय!

0
19

कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे

मेरी वेदर, कोल्हापूर येथे पार पडलेल्या महानगरपालिका स्तरावरील १९ वर्षाखालील (मुले) क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या दमदार खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी सादर केली. चाटे जूनिअर कॉलेज, महावीर कॉलेज आणि बलाढ्य कॉमर्स अशा मजबूत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विवेकानंदच्या शिलेदारांनी विजेतेपदावर नाव कोरले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संघातील निवड झालेल्या सर्व खेळाडूंची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 💐

🌟 यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! 🌟

या विजयी प्रवासामागे संस्थेचे भक्कम मार्गदर्शन लाभले —

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे सर

संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे मॅडम

संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे सर

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख व प्रशिक्षक प्रा. संतोष कुंडले, प्रा. साद मुजावर, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. समीर पठाण, रजिस्ट्रार एस. के. धनवडे आणि श्री सुरेश चरापले यांचे अमूल्य मार्गदर्शन संघाला बळ देणारे ठरले.

📣 विवेकानंदच्या विजयी गरुडपंखांना मनःपूर्वक सलाम!
रत्नागिरी विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! 🏏✨

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here