कृषी महाविद्यालय, पुणे येथे ‘नैसर्गिक शेती’ विषयावरील चर्चासत्र…

0
19

प्रतिनिधी प्रा. मेघा पाटील

पुणे, दि. 18 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नैसर्गिक शेती’ या महत्त्वपूर्ण विषयावर आज (मंगळवार, 18 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजता कृषी महाविद्यालय, पुणे येथे भव्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

राज्यभरातील कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ, संशोधक, कृषी अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शेतकरी प्रतिनिधी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक शेतीचे तत्त्वज्ञान, रासायनिक शेतीमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम, पर्यावरणपूरक शेती पद्धती आणि शाश्वत अन्न सुरक्षा या विषयांवर या चर्चासत्रात सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आचार्य देवव्रत हे देशभरात नैसर्गिक शेतीचे अग्रदूत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे तरुण शेतकऱ्यांमध्येही पर्यावरणस्नेही शेती पद्धतीबद्दल नवीन जागरूकता निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाची उत्सुकता उपस्थितांमध्ये दिसून येत आहे.

हा संपूर्ण कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्यात येत असून खालील लिंकद्वारे तो पाहता येईल:
The programme can be seen on the following link:
https://www.youtube.com/live/mZkFcBuksXo?si=KdisINvDEjY37b9P

नैसर्गिक शेतीसारख्या महत्त्वाच्या विषयावर होणारे हे चर्चासत्र राज्याच्या कृषिक्षेत्राच्या भवितव्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here