
कोल्हापूर – ( प्रतिनिधी ) – पांडुरंग फिरिंगे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण याची शिकवण दिली आहे. या शिकवणीला अनुसरून बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालावा ,यासाठी शिवसेना पक्ष वंचित ,निराधार व सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी कायमच लढत राहणार असल्याचे सांगत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे समाजसेवेचा अखंड ज्ञानयज्ञ आहे,असे गौरवोद्गार , उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना महिला आघाडी कोल्हापूर स्मिता सावंत यांनी केले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर शहर महिला आघाडी सेनेच्यावतीने सोमवारी राजेंद्र नगर येथील गरीब कुटुंबातील रिक्षा चालक विनोद दादा सातपुते जे एक भाड्याची रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाण करतात त्यांच्यावर त्यांचे आई-वडील भाऊ बायको आणि मुलगा अवलंबून आहेत.
तसेच त्यांना मोतीबिंदूमुळे डोळ्याला दिसायचं कमी आलो होतं व त्यांची रिक्षा चालवायची देखील बंद होती. एक मदतीचा हात म्हणून व बाळासाहेबांचे विचार व त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनोद दादा यांचे दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन स्मिता शरदचंद्र सावंत यांनी स्वखर्चाने मोफत करून दिले. व त्यांची विचारपूस करण्यासाठी आज सर्व महिला आघाडी त्यांची भेट घेतली…
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी वर्षा पाटील ,पल्लवी चिखलीकर ,कोमल पवार ,स्वाती सांगावकर ,संगीता वडर ,व भागातील मंडळी उपस्थित होती

