सेवा निवृत्त जवांनासाठी हयात दाखला मेळावा

0
8

प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे PCDA नौदलातील अधिकारी मुंबई व त्यांची टीम येणार आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांचा Digital Life Certificate (जीवन प्रमाणपत्र/हयातीचा दाखला) संदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधुन सेवानिवृत्त झालेले सैनिक, सेवानिवृत्त झालेले अधिकारी व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here