प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 रविवार, 23 नोव्हेंबर रोजी होणार असून परीक्षेसाठी राज्यभरातील 37 जिल्हास्तरावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण 1 हजार 423 केंद्र निश्चित केली आहेत.
पेपर 1 व पेपर 2 साठी एकूण 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. पेपर 1 साठी 571 केंद्र तर पेपर 2 साठी 852 केंद्रावरील प्रत्येक वर्गखोली व परिसरात CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
Frisking (HHMD):- परीक्षा केंद्रात प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थी (दिव्यांग उमेदवारांचे लेखनिकासह) यांचे मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने Frisking केले जाणार आहे. परीक्षार्थींनी इलेक्ट्रॉनिक साहित्य उदा. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर इत्यादी उपकरणे परीक्षा केंद्रात घेवून येवू नयेत.
परीक्षार्थींचे बायोमेट्रीक, Face Recognition व तपासणी :- परीक्षा केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येक परीक्षार्थीची हॅन्ड होल्ड मेटल डिटेक्टरच्या (HHMD) सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांचे (Biometric) बायोमेट्रीक घेतले जाणार आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याचे Face Recognition केले जाणार आहे. मूळ विद्यार्थ्याऐवजी अन्य उमेदवार प्रवेश करत असल्याचे आढळल्यास त्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
परीक्षेसंबंधी कोणत्याही सोशल मीडिया, युट्युब चॅनेल्सवरील चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून www.mscepune.in व http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांचा अवलंब करावा, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी केले आहे.

