
कोल्हापूर :जानवी घोगळे
येथील महावीर महाविद्यालयाच्या एनसीसी,एन.एस.एस व माजी विद्यार्थी संघ यांच्या मार्फत मार्फत ‘ एन.सी.सी. दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयातील एन.सी.सी. छात्र,एन.एस.एस चे स्वयंसेवक,विद्यार्थी,प्राध्यापक, माजी विद्यार्थी यांनी या उपक्रमात भाग घेऊन रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ.अद्वैत जोशी यांनी केले ‘ रक्तदान हे एक महान सामाजिक कार्य आहे,यातून अनेक लोकांचे प्राण वाचवण्याचे कार्य घडते, विद्यार्थ्यांनी हे सामाजिक भान जपावे ‘ असे मनोगत यावेळी मा.प्राचार्य डॉ अद्वैत जोशी यांनी व्यक्त केले.यावेळी माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी सागर पाटील,अनुराधा देसाई, अक्षय ढेवले, प्रा.जयवंत दळवी,डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. अंकुश गोंडगे, प्रा. रवी पाडवी,डॉ. संदीप पाटील, प्रा. स्नेहल घोरपडे, प्रा. श्वेता परुळेकर उपस्थित होते. शाहू ब्लड बँकचे लखन पाटील व त्याचे सहकारी रोटरी क्लबचे प्रदीप कारंडे, निलेश कुत्ते यांचे बहुमल सहकार्य लाभले. या उपक्रमाचे आयोजन कॅप्टन उमेश वांगदरे, कॅप्टन सुजाता पाटील, डॉ. प्रदीप गायकवाड, डॉ. अंकुश बनसोडे, प्रा.सचिन बराटे यांनी प्राचार्य डॉ.अद्वैत जोशी, कर्नल विक्रम नलावडे, लेफ्टनंट कर्नल अमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली केले.





