Kolhapur- जोतिबा डोंगरावर लाखोंच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेला सुरुवात

0
82

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

: श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणेला लाखोंच्या उपस्थितीत सुरुवात झाली. ही दिंडी पुर्ण केल्या नंतर बारा जोतिर्लिग व चारधाम यात्रा केल्याचे पुण्य लाभत असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.

सकाळी साडेनऊ वाजता मुख्य मंदिरातुन दिडी सोहळ्याची सुरुवात झाली. तत्पूर्वी विणा पुजना नंतर डवरी मार्गस्थ झाले. दिंडीच्या मध्यभागी विणा व डमरू घेऊन डवरी होते. त्यांच्या सोबत भगवे ध्वज घेऊन पुजारी व भाविक होते. धार्मिक विधी पुर्ण झाल्या नंतर मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून दिडी बाहेर पडून गायमुखाकडे मार्गस्थ झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here