विवेकानंद महाविद्यालयात औषधांचे रासायनिक पृथ्थकरण व दर्जा विषयक कार्यशाळा संपन्न

0
21

कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
-विवेकानंद महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे Analytical Techniques Application in Pharmaceutical Analysis and Quality Control या विषयावर अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत कार्यशाळा पार पडली. बी.एस्सी. व एम.एस्सी. रसायनशास्त्रचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच क्लस्टरमधील इतर महाविद्यालयांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

डॉ. रवींद्र गायकवाड आणि डॉ. अजित एकल यांनी औषधांचे रासायनिक पृथ्थकरण, गुणवत्ता नियंत्रण आणि या क्षेत्रातील करिअर संधी याबाबत मार्गदर्शन केले. OJT–On Job Training (NEP) अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संकल्पनांची ओळख करून देण्यात आली.

कार्यशाळेला प्र. प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, डॉ. श्रुती जोशी, डॉ. वर्षा मैंदरगी, डॉ. व्ही. बी. वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व प्रशासकीय कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here