
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, माळवाडी संचलित श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथे संस्थेच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त व संस्थेचे संस्थापक स्वर्गीय श्रीपतराव चौगुले (दादा) यांच्या चौदाव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) तसेच संस्था वर्धापन दिन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले होते. प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संपदा पिसे, ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार, IQAC समन्वयक डॉ. बी. एन. रावण आणि सहसमन्वयक डॉ. एस. एस. कुरलीकर उपस्थित होते.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविधरंगी रांगोळ्यांनी परिसर रंगून गेला. कलात्मकता, सर्जनशीलता आणि कल्पकतेने परीक्षकांसमोर आव्हानच उभे केले.
◾ लहान गटातील विजेते :
- प्रथम – काव्या नितीन पाटील (इयत्ता २री)
- द्वितीय – अभिलाशा अमर चौगुले (इयत्ता ४ थी)
- तृतीय – आराध्या जितेंद्र कांबळे (इयत्ता ४ थी)
◾ मध्यम गटातील विजेते :
- प्रथम – वेदिका संदीप पाटील (इयत्ता ८ वी)
- द्वितीय – वसुंधरा संदीप कापसे (इयत्ता ६ वी)
- तृतीय – आदिती सुहास पाटील (इयत्ता ७ वी)
◾ मोठ्या गटातील विजेते :
- प्रथम – विरांगणी बाजीराव पाटील (बी.ए. भाग २)
- द्वितीय – रेवती युवराज कुंभार (१२ वी – सायन्स)
- तृतीय – माधवी विलास चौगुले (डी.एड. भाग १)
स्पर्धेचे परीक्षण डॉ. एस. एस. पिसे, एस. एस. वंजीरे, डॉ. एम. एच. पाटील, प्रा. एस. पी. कुंभार, प्रा. एच. एस. शिरसट व एस. एस. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. प्रतिभा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सीमा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन प्रा. सीमा कुंभार यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

