
फोटो ओळ : व्यक्तिमत्व विकास व्याख्यानात मार्गदर्शन करताना ऍड. अजित खटावकर; समवेत डॉ. संपदा पिसे व डॉ. मनीषा सावंत.
कोतोली प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
“चांगल्या सवयी, नियमित वाचन आणि व्यायाम या गोष्टी अंगीकारल्या तर विद्यार्थी केवळ करिअरमध्येच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरतात. व्यक्तिमत्व विकास हा आयुष्याची गुणवत्ता उंचावणारा मुख्य पाया आहे,” असे प्रतिपादन ऍड. अजित खटावकर यांनी केले.
श्रीपतराव चौगुले विधी महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास या विषयावर आयोजित व्याख्यानात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संपदा पिसे होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून एन.सी.सी. अधिकारी लेफ्टनंट डॉ. मनीषा सावंत उपस्थित होत्या. कार्यक्रमास ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले आणि सचिव शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. प्रियांका पाखरे यांनी केले, तर आभार प्रतिज्ञा सुतार यांनी मानले. शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

