
एसपी नाईन प्रतिनिधी रोहित डवरी
रत्नागिरी, प्रतिनिधी :एस पी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशनच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष तसेच एस पी-9 मराठी न्यूज चॅनलच्या रत्नागिरी जिल्हा संपादक मेघा कोल्हटकर यांनी आज रत्नागिरी पोलीस मुख्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस महामुनी साहेब यांची भेट घेऊन एस पी-9 मराठी माध्यम समूह तसेच निर्भया वुमन असोसिएशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.भेटीदरम्यान बोलताना मेघा कोल्हटकर यांनी सांगितले की, “एस पी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशन हे महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक संधी, मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ देण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे.”या असोसिएशनच्या माध्यमातून सध्या रत्नागिरी जिल्ह्यात महिलांचे संघटन, जनजागृती, मार्गदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. पुढील काळात महिलांसाठी रोजगाराच्या संधी, **शासनाच्या योजनांची माहिती, कायदेशीर साक्षरता, स्वसंरक्षण प्रशिक्षण, कौशल्य विकास यांसारखे उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.या भेटीच्या वेळी पोलीस अधिकारी शबनम मुजावर तसेच इतर महिला पोलीस अधिकारी उपस्थित होत्या. मेघा कोल्हटकर यांनी पोलीस प्रशासनाकडे एक विशेष विनंती करत सांगितले की, “या महिला संघटनेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या महिलांना सहकार्य, मार्गदर्शन आणि आवश्यक ती मदत देण्यात यावी,”जेणेकरून महिलांचे सबलीकरण अधिक प्रभावीपणे करता येईल.

उल्लेखनीय बाब म्हणजे, मेघा कोल्हटकर या एक प्रसिद्ध लेखिका असून त्यांच्या उत्कृष्ट लेखणीतून अनेक दर्जेदार लेख आणि पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या आपल्या निर्भीड, निष्पक्ष आणि सत्यनिष्ठ लेखनासाठी ओळखल्या जातात. सामाजिक प्रश्न, महिला अधिकार आणि अन्यायाविरुद्ध त्या सातत्याने आपल्या लेखणीतून आवाज उठवत आहेत.त्यांना एस पी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशनच्या संस्थापिका व अध्यक्षा प्रा. मेघा सागर पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच रत्नागिरी जिल्ह्यात महिलांना संघटित करून एक सशक्त चळवळ उभारण्याचे कार्य वेग घेऊ लागले आहे.या भेटीमुळे महिला सबलीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले असून, माध्यमे, प्रशासन आणि महिला संघटना यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी एक नवे, सक्षम आणि सुरक्षित वातावरण उभे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


