
छायाचित्रात :-विजयी रोलर हाॅकी संघा सोबत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रा. डॉक्टर महेश अभिमन्यू कदम.
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर :- जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर मुंबई यांच्या वतीने अमेय क्लासिक क्लब विरार येथे घेण्यात आलेल्या राज्य शालेय रोलर हॉकी स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने या स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवला या संघाने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करताना पहिल्या सामन्यांमध्ये नागपूर संघाचा ११/० अशा गोल फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यामध्ये पुणे विभागाचा २/१ गोलने पराभव केला .फायनल सामन्यामध्ये मुंबई विभागाच्या ३/१ गोलने पराभव करून सुवर्णपदकाचा मानाचा मान मिळविला. विजयी संघाकडून हर्षवर्धन जगताप यांनी १० गोल .साकेत आपके .याने ४ गोल श्लोक पटेल यांने २ गोल नोंदवले या संघाचे सोमवारी कोल्हापूर मध्ये आगमन झाले. विजयी संघातील खेळाडू पुढील प्रमाणे१ ) हर्षवर्धन जगताप २)श्लोक पटेल ३) अश्वजीत पाटील.४) नोमान देसाई.५) स्मित मासूम.६) क्षितिज कदम ८)आयुष सावंत ९)निहाल कोतवाल.१०) केविन गोन्साल्वीस सर्विस या खेळाडूंचा समावेश होता.त्याचा त्यांचा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे यांच्या हस्ते व प्राचार्य सचिवा प्राचार्य सौ शुभांगी मुरलीधर गावडे संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते संस्थेच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला या संघास स्कूल मधील सर्व क्रीडा शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन तर जिमखाना विभाग प्रमुख प्रा.डॉ.महेश अभिमन्यू कदम. राष्ट्रीय कोच भास्कर कदम. विश्व चॅम्पियन तेजस्विनी कदम .ॲड. धनश्री कदम.यांचे प्रशिक्षण लाभले
मा, संपादक सो,
दैनिक—–
वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक प्रसिद्ध करू सहकार्य करावे ही विनंती
प्रा. डॉ. महेश कदम

