
प्रतिनिधी : जानवी घोगळे
महाराष्ट्रातील आयुक्त शिक्षण, सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक, उपसंचालक, प्राचार्ज डायट व शिक्षणाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक आज ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे संपन्न झाली. यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
येणाऱ्या २६ जानेवारी २०२६ रोजीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने देशभक्तीपर गीतांवर आधारित विशेष सामूहिक कवायत संचलन राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये एकसमान पद्धतीने आयोजित करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक कसरत, राष्ट्रभक्ती, सांघिक शिस्त, तालबद्धता आणि सांस्कृतिक मूल्यांची जडणघडण अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शाळांनी उच्च दर्जाचा संचलन कार्यक्रम सादर करावा, असे निर्देश यावेळी दिले.
तसेच कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी तालमी, विद्यार्थ्यांची तयारी, सुरक्षा उपाययोजना याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्यातील सर्व शाळांनी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम भव्य, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरेल यासाठी पूर्ण समन्वयाने कार्य करावे, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला.

यावेळी या ऑनलाइन बैठकीत श्री. सचिंद्र प्रतापसिंह, आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, श्री. श्रीनील कुलकर्णी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, श्री. राहुल रेखावार, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) महाराष्ट्र पुणे, श्री. महेश पालकर, संचालक माध्यमिक शिक्षण विभाग, श्री. शरद गोसावी, संचालक प्राथमिक शिक्षण विभाग, श्री. के. बी. पाटील, संचालक योजना विभाग तसेच सर्व सहसंचालक, उपसंचालक आणि प्राचार्य उपस्थित होते.

