उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
8

प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे

कोल्हापूर दि. ६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पदाधिकाऱ्यांसह डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि समता याबाबत बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांची उजळणी करत त्यांचे स्मरण केले. संविधान निर्मात्यांच्या कार्याचे स्मरण करून समाजात ऐक्य, बंधुता आणि प्रगतिच्या संकल्पनेशी बांधिलकी जपण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या विचारांचे समाजाला भान देण्यासाठी अधिकाधिक जनजागृती उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी डॉ. आंबेडकर यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here