
प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर : जनता शिक्षण संस्थेच्या नेहरु विद्यामंदिर कोतोली च्या मुख्याध्यापक पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सुरेश श्रीपती लोहार यांची मुख्याध्यापक म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांना नवीन दिशा मिळेल, असा विश्वास संस्थेमध्ये व्यक्त केला जात आहे.
निवडीच्या वेळी अरुण सावंत, एस. डी. पाटील, सुभाष लव्हटे, लक्ष्मी बोरगे, वाय. के. पाटील , दत्तात्रय खोत, शिवाजी कुंभार तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवडीनंतर नवीन मुख्याध्यापक सुरेश लोहार यांनी एसपी न्यूजशी बोलताना शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण घडणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची त्यांनी ग्वाही दिली.
मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

