
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर, दि. 12 : विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमध्ये इकोक्लबतर्फे ११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यात आला. पर्वतांचे पर्यावरणीय व जीवनावश्यक महत्त्व प्रतिपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर प्रदर्शन आयोजित केले. हवामान बदल, गोड्या पाण्याचे संवर्धन आणि पर्वतीय जैवविविधतेचे रक्षण यावर आधारित पोस्टर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी प्रा. डॉ. ए. जे. पाटील आणि प्रा. एच. जी. पाटील यांनी पर्वतांचे पाणी, अन्न, जीवसृष्टी आणि मानवाच्या उपजीविकेतील योगदान स्पष्ट केले. शाश्वत पर्वतीय विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. एम. आर. नवले, SQAAF प्रमुख प्रा. गीतांजली साळुंखे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. एस. टी. शिंदे व रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

